August 27, 2024 9:54 AM August 27, 2024 9:54 AM

views 34

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नऊ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षानं आपले नेते गुलाम मोहम्मद मीर यांना डोरू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर शेख रियाझ दोडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दोडा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रदीपकुमार भगत हे काँग्रेसचे उमेदवार असतील.

August 17, 2024 10:36 AM August 17, 2024 10:36 AM

views 11

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे. मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा मोबाईल क्रमांकही जोडता येणार आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला आह...

August 17, 2024 10:35 AM August 17, 2024 10:35 AM

views 29

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर तर प्रहार जनशक्ती पक्षाला क्रिकेटची बॅट हे चिन्ह मिळालं आहे.

August 16, 2024 7:29 PM August 16, 2024 7:29 PM

views 16

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात आणि हरयाणामध्ये एका टप्प्यात विधानसभा निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर,  २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२४ अशा तीन टप्प्यात मतदान होईल. जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ असे एकूण ९० मतदारसंघ आहेत. काश्मिरी पंडित आणि पीओके मधील विस्थापितांसाठी  नायब राज्यपालांकडून एकूण तीन जागांवर उमेदवार दिले जातील. त्यामुळे या राज्यात एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.       हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी १ ऑक्टोबर रोजी मतदान हो...

September 25, 2024 6:03 PM September 25, 2024 6:03 PM

views 560

विधानसभा निवडणुक : वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्ह ‘गॅस सिलिंडर’

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे. वंचित चे सर्व उमेदवार गॅस सिलिंडर तर प्रहारचे उमेदवार बॅट या चिन्हावर निवडणूक लढवतील. जातीय सेना पक्षाला कोबी हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलंय.

August 15, 2024 6:53 PM August 15, 2024 6:53 PM

views 14

बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः निवडणूक न लढवण्याचे अजित पवार यांचे संकेत

बारामतीतून विधानसभा निवडणूक आपण सात-आठ वेळा लढली असून आता मला ती लढवण्यात स्वारस्य नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार आज म्हणाले. आपला मुलगा जय पवार याला उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे जय याच्या उमेदवारीविषयी पक्षाचं संसदीय मंडळ निर्णय घेईल, असं पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं. 

August 13, 2024 10:15 AM August 13, 2024 10:15 AM

views 11

नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न – काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला

महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असून, ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यातल्या महाविकास आघाडीच्या नवनियुक्त खासदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

August 7, 2024 8:35 PM August 7, 2024 8:35 PM

views 12

महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची काँग्रेसची भूमिका

महाविकास आघाडीत कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं.   विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत गांधीभवनात झाली. त्यानंतर पटोले बातमीदारांशी बोलत होते.   आजच्या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली, तसंच राज्यातल्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जागा वाटपाचा निर्णय गुणव...

July 30, 2024 8:06 PM July 30, 2024 8:06 PM

views 15

विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत घ्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं म्हणून गाफील राहू नका, विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत घ्या, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत बोलत होते.   विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे, राज्यात परिवर्तन व्हावं ही जनतेची भावना आहे. त्यामुळे आपण जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे, असं ते म्हणाले.

July 20, 2024 7:13 PM July 20, 2024 7:13 PM

views 13

राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कल असल्याचा शरद पवार यांचा दावा

राज्यात जनतेने ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सुटले नाहीत. आता जनतेने महाविकासआघाडीकडून अपेक्षा ठेवल्या असून मविआ राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   पाच वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने ४८ पैकी ३१ खासदार निवडून महाविकास आघाडीला मोठी साथ दिली. या...