October 2, 2024 1:39 PM October 2, 2024 1:39 PM

views 12

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांमधे एकूण ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. याआधी, १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात ६१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं होतं तर २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झालं होतं. हरियाणामध्ये येत्या शनिवारी एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे. हरियाणात पलवल इथं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झा...

September 29, 2024 5:13 PM September 29, 2024 5:13 PM

views 11

विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची १२ जागांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतले तीन प्रमुख पक्ष इतर समविचारी पक्षांचा विचार न करता आपसातच जागावाटपाची चर्चा करत असल्याची नाराजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी माकपनं केवळ १२ जागांची मागणी केला आहे. इतर पक्षांनीही मर्यादित जागांची मागणी केली आहे. पण त्यांना जागावाटपाच्या प्रक्रियेत अद्याप सामावून घेतलेलं नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे, असं माकपच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

September 23, 2024 2:13 PM September 23, 2024 2:13 PM

views 13

जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार

जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रियासी, राजौरी, पूंछ, श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांमधल्या २६ मतदारसंघांसाठी येत्या बुधवारी २५ सप्टेंबर रोजी मतदान होईल. येत्या ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पूंछ आणि श्रीनगरमध्ये प्रचारसभांना संबोधित करत आहेत. नॅशनल कॉन्फरन्स - काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार शहानवा...

September 22, 2024 7:22 PM September 22, 2024 7:22 PM

views 15

विधानसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागा वाटपाबाबत आठवडाभरात निर्णय होईल – शरद पवार

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून, एकत्र लढणार असून, जागा वाटपासाठी चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत होते. आठवडाभरात या बाबत निर्णय होऊन त्यानंतर घटक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील, असं ते म्हणाले. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारनंही याबाबती...

September 17, 2024 8:05 PM September 17, 2024 8:05 PM

views 20

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या २४ मतदारसंघांमध्ये मतदान

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे. ९० अपक्षांसह एकूण २१९ उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. सात जिल्ह्यांमधल्या मिळून २४ विधानसभा मतदारसंघांमधे मतदान होणार असून त्यात जम्मूतले ४ तर काश्मीर खोऱ्यातले १६ मतदारसंघ आहेत. ऑगस्ट २०१९ मधे कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश घोषित झाला आणि त्यानंतर प्रथमच तिथं विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या दृष्टीनं जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासन सज्ज असून अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बज...

September 16, 2024 7:55 PM September 16, 2024 7:55 PM

views 9

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी स्थानिक प्रशासन सज्ज होत आहे. जम्मू काश्मीरमधे मुख्य निवडणूक अधिकारी पी. के. पोल यांनी मतदारांसाठी विशेष जागृती अभियान सुरु केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा स्वीप कार्यक्रम येत्या १८ सप्टेंबरपासून पूर्ण केंद्रशासित प्रदेशात राबवला जाणार आहे. या जागृती अभियानात मतदार मतदान करण्याची शपथ घेणार असून त्यांना मतदान प्रतिबद्धतेचं प्रमाणपत्र दिलं जाईल. जम्मू काश्मीरमधे येत्या १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्य...

September 10, 2024 8:20 PM September 10, 2024 8:20 PM

views 14

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती स्थापन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. त्यात तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख, विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश असल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार केल्याचं ते म्हणाले. जाहीरनामा समितीचं प्रमुखपद सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात आलं असून प्रचार यंत्रणा रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली असेल. महायुती निवडण...

September 8, 2024 2:19 PM September 8, 2024 2:19 PM

views 18

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी मागं घेण्याची मुदत संपली असून आता प्रचाराला वेग येत आहे. भारतीय जनता पार्टीनं प्रचाराला जोमदार सुरुवात केली आहे. पक्षाचे स्टार प्रचारक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज रामबन आणि बनिहालमधे प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल जम्मूच्या पालोरा भागात सभा घेतली. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनीही जम्मू काश्मीरला भेट दिली. या आठवड्यात प्रधआनमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष...

September 6, 2024 7:20 PM September 6, 2024 7:20 PM

views 14

राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी किती जागा लढवाव्यात याबद्दल महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नसून राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर त्याआधीच्या सरकारने सुरू केलेल्या १५  योजना त्यांनी बंद केल्या, आता महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर ५० ते ६० योजना बंद करण्याचा त्यांचा विचार आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे, राज्यातल्या १४ कोटी जनतेच्या कल्याणास...

August 29, 2024 12:59 PM August 29, 2024 12:59 PM

views 13

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. उमेदवारी अर्ज आजपासून येत्या ५ सप्टेंबरपर्यंत  भरता येतील. अर्जांची छाननी येत्या ६ सप्टेंबरला होणार असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत ९ सप्टेंबरपर्यंत आहे. येत्या २५ सप्टेंबरला मतदान होणार आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या गंदेरबाल, श्रीनगर, बडगाम, राजौरी, पूँछ आणि रियासी या ६ जिल्ह्यात मिळून २६ मतदारसंघांमधे या टप्प्यात निवडणूक होणार आहे. सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहे.