October 30, 2024 12:12 PM October 30, 2024 12:12 PM

views 3

राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल

महाराष्ट्रातल्या २८८ विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या आणि अपक्ष अशा ७ हजार ९९५ उमेदवारांनी दहा हजार ९०५ अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी आज होणार असून चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, शेवटच्या दिवशीही अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील.

October 26, 2024 10:02 AM October 26, 2024 10:02 AM

views 16

विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत ९९१ उमेदवारांचे १ हजार २९२ अर्ज दाखल झाले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी तसंच औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे अतुल सावे यांनी काल अर्ज दाखल केले. दरम्यान, एमआयएमच्या वतीने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून नासेर सिद्दिकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ज...

October 22, 2024 3:06 PM October 22, 2024 3:06 PM

views 15

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, सयाजी शिंदे, आमदार अमोल मिटकरी यांच...

October 18, 2024 3:54 PM October 18, 2024 3:54 PM

views 7

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. २५ ऑक्टोबरपर्यंत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २८ तारखेला अर्जांची छाननी होईल आणि ३० ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांमधे १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. राज्यात भाजपा, एजेएसयू, संयुक्त जनता दल आणि चिराग पासवान यांच्या एलजीपी पक्षांनी आघाडी केली असून झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस,राष्ट्री...

October 17, 2024 6:51 PM October 17, 2024 6:51 PM

views 27

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार आणि राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार

महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहीत नमुने देखील दिले आहेत. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, Know Your Candidate या लिंकवर उपलब्ध असेल.

October 16, 2024 7:26 PM October 16, 2024 7:26 PM

views 12

मतदान केंद्रांची माहिती मिळण्यासाठी मुंबईतल्या मतदारांना घरपोच पत्र

मतदान केंद्रांची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी मुंबईतल्या मतदारांना घरपोच पत्र दिली जात आहेत. त्यात दिलेला QR कोड स्कॅन केला की मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्याचा नकाशा मिळेल, अशी माहिती मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मुंबईतल्या काही मतदान केंद्रांमध्ये लागलेल्या रांगा आणि मतदारांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याची, तसंच एका मतदान केंद्राच्या ठिकाणी १० पेक्षा जास्त केंद्रं असल्यास ही कें...

October 16, 2024 3:08 PM October 16, 2024 3:08 PM

views 21

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं रिपोर्टकार्ड प्रसिद्ध

महाराष्ट्रात काल विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीने आज सरकारच्या आजपर्यंतच्या कामांचा आढावा घेणारं प्रगती पुस्तक प्रकाशित केलं.   महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्...

October 9, 2024 7:08 PM October 9, 2024 7:08 PM

views 12

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचं ‘चित्ररथ’

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसनं तयार केलेल्या चित्ररथाचं उद्घाटन आज मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते, आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं.    राज्यातल्या महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवले, राज्यातली साडेसात साख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगार गुजरातनं पळवले, असा आरोप पटोले यांनी यावेळी केला. या लुटीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ करणार अ...

October 9, 2024 3:35 PM October 9, 2024 3:35 PM

views 20

विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीची १० उमेदवारांची यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या दहा उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यात मलकापूर, बाळापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ आणि सांगली या जागांसाठी पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे.

October 8, 2024 8:50 PM October 8, 2024 8:50 PM

views 17

हरियाणात भाजपाला तर जम्मूकाश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत

जम्मू आणि काश्मीर तसंच हरियाणा विधानसभा निवडणूकीची मतमोजणी  आज झाली.    जम्मू काश्मीरमध्ये ९० विधानसभा मतदारसंघापैकी ४२ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार विजयी झाले असून भाजपाचे उमेदवार २९ ठिकाणी विजयी झाले आहेत. काँग्रेस ६, पीडीपी ३ तर जेपीसी, सीपीएम आणि आपचे उमेदवार प्रत्येकी एका ठिकाणी विजयी झाले आहेत. सात ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाम आणि गंदेरबाल या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले आहेत.    हरियाणात ९० मतदारसंघांपैकी ४८ ठिकाणी भाजपा उम...