November 7, 2024 3:29 PM November 7, 2024 3:29 PM

views 10

मतदारांना प्रलोभन देण्याच्या कारवाईत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड जमा

महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याची प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड, मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तू, मद्य, अंमली पदार्थ तसंच मौल्यवान धातू जप्त केले असल्याची माहिती भारत निवडणूक आयोगानं दिली आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात केलेल्या कारवाई अंतर्गत सुमारे २८० कोटी रुपये, तर झारखंडमधून १५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं आयोगानं कळवलं आहे. &nbsp...

November 5, 2024 1:27 PM November 5, 2024 1:27 PM

views 2

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झारखंड मधल्या गढवा इथं केली.   ते आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड चे प्रभारी हेमंत बिसवा सरमा यांनी मतांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन बांग्लादेशी घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. तर २०१९ मध्ये भाजपने आपल्या सरकार विरुद्ध कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन या...

November 1, 2024 10:46 AM November 1, 2024 10:46 AM

views 9

5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुक

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी येत्या 5 नोव्हेंबर रोजी निवडणुक होत असून, डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये लढत होणार आहे. हॅरिस यांनी काल नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन इथे प्रचार केला तर ट्रम्प यांनी बुधवारी विस्कॉन्सिन इथे प्रचार दौरा केला.   आत्तापर्यंत 5 कोटी 75 लाख अमेरिकी नागरिकांनी मतदान केंद्रांवर जाऊन किंवा ई मेलद्वारे मतदान केलं आहे. असून हजारो लोक मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान करत आहेत. स्थानिक प्...

November 1, 2024 10:49 AM November 1, 2024 10:49 AM

views 8

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी

  महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 704 मतदार असून, वयाची शंभरी पूर्ण केलेले 47 हजार 392 मतदार आहेत; अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.   या निवडणुकीसाठी राज्यातल्या 288 मतदारसंघांमधून एकंदर 7 हजार 994 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, 7 हजार 73 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, 921 उमेदवारांचे अर्ज अवै...

October 21, 2024 3:57 PM October 21, 2024 3:57 PM

views 13

बविआ पालघर जिल्ह्यातल्या ६ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार

बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातल्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांनी केली आहे. विरार पश्चिम इथं बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा काल आयोजित केला होता, यात ठाकुर यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

October 19, 2024 8:19 PM October 19, 2024 8:19 PM

views 17

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं १६ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात शहादा,  साक्री, तुमसर, अर्जुनी मोरगाव, हदगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नडमधून, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी, कोरेगाव, कराड दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.

October 18, 2024 10:56 AM October 18, 2024 10:56 AM

views 14

विधानसभा निवडणूक : काळ्या पैशाच्या वापराची नागरिक करणार तक्रार

राज्यात होणाऱ्या  विधानसभा निवडणूक प्रचारात काळ्या पैशाचा वापर होत असल्याचं नागरिकांच्या  निदर्शनास आल्यास त्यांनी आयकर विभागाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन आयकर अधिकाऱ्यांनी केलं आहे. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा, रोख रकमेची वाहतूक किंवा वाटप, अशा  संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्यास नागरिकांनी थेट आयकर विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा मेल आयडी वर संपर्क करावा अथवा ९४०३३९०९८० या व्हाट्सअप क्रमांकावर विडिओ किंवा छायाचित्र पाठवावं असं आवाहन आयकर विभागाचे नागपुरातील उप आयकर निदेशक अनिल खडसे...