September 29, 2025 9:26 AM September 29, 2025 9:26 AM

views 36

EC: आगामी निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक तैनात

भारतीय निवडणूक आयोगानं बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यांमधील आठ विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक तैनात करण्याची घोषणा केली आहे. या निरीक्षकांमध्ये सामान्य नागरिक, पोलिस आणि खर्च निरीक्षकांचा समावेश असेल. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी 320 जिल्हाधिकारी आणि 60 पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह एकंदर 470 अधिकारी केंद्रीय निरीक्षक म्हणून तैनात केले जातील.

January 19, 2025 1:32 PM January 19, 2025 1:32 PM

views 14

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार ४० उमेदवारी अर्ज वैध

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी काल झाली, त्यात १ हजार ४० अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी एकूण १ हजार पाचशे २१ उमेदवारांनी अर्ज दाखल होते. उद्याच्या दिवसात अर्ज मागे घेता येणार आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांनी अर्ज दाखल केला आहे. तर दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपच...

November 28, 2024 7:45 PM November 28, 2024 7:45 PM

views 3

विधानसभा निवडणूकीत साडेसात टक्के मतदान कसं वाढलं याचं उत्तर द्यावं- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

राज्यातल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत वाढलेलं साडेसात टक्के मतदान कसं वाढलं याचं निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.   आम्हाला मतदान प्रक्रियाच संशयास्पद वाटत असून लोकांचीही अशीच भावना असल्याचं ते म्हणाले. राज्यात तब्बल ७६ लाख मतं वाढली असून संध्याकाळी साडेपाच ते साडेअकरा या वेळेत कुठे कुठे मतदान सुरु होतं याचे पुरावे आयोगानं द्यावेत असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात झालेल्या मतदान प्रक्रियेबद्दल केंद्रीय अर्थमंत्री ...

November 25, 2024 7:50 PM November 25, 2024 7:50 PM

views 6

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेतानिवड अद्याप बाकी आहे. ती झाल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होईल, असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं.   विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र ...

November 11, 2024 7:14 PM November 11, 2024 7:14 PM

views 12

जीएसटीच्या माध्यमातून वसूल केलेले पैसे लाडकी बहीण योजनेद्वारे वाटले – जयंत पाटील

महायुती सरकारच्या काळात जीएसटीच्या माध्यमातून जनतेकडून पैसे वसूल करून तेच लाडकी बहीण योजनेद्वारे वाटले गेले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते आज पुणे जिल्ह्यातल्या पर्वती मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर महागाई कमी करू असं आश्वासन पाटील यांनी दिले. 

November 11, 2024 7:56 PM November 11, 2024 7:56 PM

views 9

काँग्रेसच्या २८ पदाधिकाऱ्यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी दाखल केल्याबद्दल तसंच पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसने विविध मतदारसंघातल्या २८ पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. ही कारवाई प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून केल्याची माहिती काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिली. कारवाई केलेल्या पदाधिकाऱ्यात आनंदराव गेडाम, शिलु चिमुरकर, सोनल कोेवे, भरत येरमे, अभिलाषा गावतुर...

November 10, 2024 11:06 AM November 10, 2024 11:06 AM

views 19

विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ दहाच दिवस उरले असल्यानं राजकीय पक्षांच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. प्रचारसभा, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, विविध संस्थांसोबतच्या बैठका याद्वारे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

November 6, 2024 11:10 AM November 6, 2024 11:10 AM

views 5

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये एकत्रित जाहीर सभा घेत प्रचाराचं रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही काल राज्यात ठीकठिकाणी ...

November 6, 2024 10:13 AM November 6, 2024 10:13 AM

views 4

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती दिली.  ‘‘राज्यात मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून, एकूण एक लाख १८६ मतदान केंद्र असल्याचं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. यामध्ये शहरी मतदान केंद्र ४२ हजार ६०४, तर ग्रामीण मतदान केंद्र ५७ हजार ५८२ इतकी आहेत. शहरी भागातल्या मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातल्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, यासाठी राज...

November 5, 2024 1:27 PM November 5, 2024 1:27 PM

views 2

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झारखंड मधल्या गढवा इथं केली.   ते आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड चे प्रभारी हेमंत बिसवा सरमा यांनी मतांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन बांग्लादेशी घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. तर २०१९ मध्ये भाजपने आपल्या सरकार विरुद्ध कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन या...