November 17, 2025 3:50 PM November 17, 2025 3:50 PM

views 85

राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या, मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील.   २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. आहे. उद्या, मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा...

November 27, 2024 8:26 PM November 27, 2024 8:26 PM

views 7

राज्यात सत्तास्थापनेबाबत अद्याप निर्णयाची प्रतीक्षा, मुख्यमंत्री आज भूमिका स्पष्ट करणार

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही अडसर नाही, कसलीही नाराजी नाही असं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे कळवल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात आपली ओळख लाडका भाऊ अशी झाली याचं समाधान आह...

November 24, 2024 7:09 PM November 24, 2024 7:09 PM

views 5

राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना आणि राजपत्राच्या प्रती भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज राज्यपाल सी राधाकृष्णन यांना सादर केली. विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. यात निवडून आलेल्या सदस्यांची नावं राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास आणि कक्ष अधिकारी निरंजन कुम...

November 19, 2024 7:47 PM November 19, 2024 7:47 PM

views 13

पैसे वाटप प्रकरणी भाजपा नेते विनोद तावडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली आहे. प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाच्या बाहेरील राजकीय व्यक्तीला तिथे थांबता येत नाही. या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तावडे पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केला होता. हॉटेलची तपासणी केल्यानंतर निवडणूक यंत्रणेला ९ लाख ९३ हजार ५०० रुपये आणि काही कागदपत्रं सापडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया...

November 17, 2024 3:09 PM November 17, 2024 3:09 PM

views 8

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात

राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्याने उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो केला. त्यानंतर ते आज दुपारी चांदवड आणि संध्याकाळी कोल्हापुरात इचलकरंजी इथे जाहीर सभा घेणार आहेत.  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आज नागपुरात उमरेड इथे जाहीर सभा घेत आहेत. महाविकास आघाडीची प्रचाराची समारोपाची जाहीर सभा आज मुंबई इथे होणार आहे. या सभेसाठ...

November 9, 2024 7:00 PM November 9, 2024 7:00 PM

views 7

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं कमालीचा वेग घेतला आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद आज राज्यभरात होत आहेत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि इतर समाजमाध्यम व्यासपीठांवर आपापली भूमिका मांडून उमेदवार आणि त्यांच्या पक्षांचे प्रचारक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

November 6, 2024 1:17 PM November 6, 2024 1:17 PM

views 7

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून १० वचनांची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर इथल्या सभेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. या सभेत त्यांनी १० वचनांची घोषणा केली. यात लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना एकविसशे रुपये, २५ लाख रोजगार निर्मिती तसंच अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार रुपये वेतन, वीज बिलात ३० टक्के कपात अशा वचनांचा समावेश आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित हो...