December 12, 2025 10:40 AM December 12, 2025 10:40 AM

views 8

6 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण वेळापत्रकात सुधारणा

भारतीय निवडणूक आयोगानं सहा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. यामध्ये तमिळनाडु, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे आणि उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे.   ही राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मसुदा मतदार यादी या महिन्याच्या 16 तारखेला प्रकाशित केली जाईल. 6 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून विनंती मिळाल्यानंतर वेळापत्रकात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला अस...

December 9, 2025 3:06 PM December 9, 2025 3:06 PM

views 23

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी दोन संयुक्त पूर्वपरीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.   गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आधी २१ डिसेंबर रोजी होणार होती, ती आता ४ जानेवारी रोजी होणार आहे. तर गट ३ संयुक्त पूर्वपरीक्षा ११ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचं आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे.

November 8, 2025 1:39 PM November 8, 2025 1:39 PM

views 105

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचाराला वेग

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. रालोआ आणि महाआघाडीचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी सभा आणि बैठकांचा धडाका लावला आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सितामढी आणि बेत्तीया इथल्या प्रचारसभांना संबोधित करतील. ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रोहतस आणि कैमुर जिल्ह्यात सभा घेतील तर गृहमंत्री अमित शहा कटिहार इथल्या प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. रालोआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उत्तरप्र...

November 7, 2025 9:59 AM November 7, 2025 9:59 AM

views 163

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी 64 पूर्णांक 66 टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत, विक्रमी 64 पूर्णांक 66 टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात एकंदर 1 हजार 3 शे 14 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ई व्ही एम मशीन मध्ये सीलबंद झालं आहे. या टप्प्यात, एकंदर 1 हजार 3 शे 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, नितीश कुमार मंत्रिमंडळातील 16 मंत्री आणि महाआघाडीबंधनाचे उमेदवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.   काही तुरळक...

July 11, 2025 9:18 AM July 11, 2025 9:18 AM

views 43

अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

महाराष्ट्र राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १ जुलै २०२५ पर्यंत अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे घेतल्या जातील असं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं काल स्पष्ट केलं.    राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दृक-श्राव्य माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्थानिक निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जाणार नाही, त्याऐवजी भारतीय निवडणूक आयोगाच्या याद्या वापरल्या जातील.   वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष अपंग मतदारांसाठी मतदान के...

February 9, 2025 2:51 PM February 9, 2025 2:51 PM

views 17

दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आतिशी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.     दिल्ली विधानसभेच्या काल जाहीर झालेल्या निकालात भाजपाने जवळपास तीन दशकांनंतर जोरदार पुनरागमन करत ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला, आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं, तर काँग्रेसला भोपळा फोडण्यात अपयश आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर...

January 24, 2025 1:21 PM January 24, 2025 1:21 PM

views 12

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराला वेग

येत्या ५ फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून सर्व प्रमुख पक्षांचे नेते जाहीरसभा, रॅली, रोड शो आणि मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहे.   उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, आज दिल्ली मतदारसंघात रॅली घेणार असून भाजपा नेते अनुरागसिंग ठाकूर, द्वारका, मंगोलपुरी आणि दिल्लीत विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत तर भाजपा नेत्या बांसुरी स्वराज शालिमार मतदारसंघातल्या मतदारांशी संवाद साधणार आहेत.   आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी म...

January 18, 2025 2:53 PM January 18, 2025 2:53 PM

views 10

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी १ हजार ५२१ उमेदवार अर्ज दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी एकूण १ हजार पाचशे २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६८० उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर येत्या २० जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.   नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २९ उमेदवारांचे सर्वाधिक ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे पर...

December 10, 2024 3:24 PM December 10, 2024 3:24 PM

views 13

विधानसभा निवडणुकीच्या वेळी व्हिव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं पालन – निवडणूक आयोग

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही पाच मतदान केंद्रावरच्या VVPAT चिठ्ठ्या मोजणं आवश्यक आहे. यानुसार २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी प्रत्येक मदारसंघातल्या प्रत्येकी पाच मतदान केंद्रावरच्या VVPAT चिठ्ठ्या मोजण्यात आल्या होत्या, असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. त्यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते असंही यात म्हटलं आहे. या मोजणीनुसार २८८ मतदारसंघातल्या १ हजार ४४० V V PAT युनिटची मोजणी करून ते संबंधित कंट्रोल युनिट डाटाशी जुळवून पाहण्य...

November 27, 2024 7:53 PM November 27, 2024 7:53 PM

views 13

यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवणार

यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यासंदर्भात नुकतीच दिल्लीत बैठक झाली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्ल्लीकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी आपण स्वतः चर्चा केली आहे. देशभरात या संदर्भात काँग्रेस जनआंदोलन करणार आहे. राज्यात दोन दिवसानंतर सह्यांची मोहीम सुरु केली जाईल. कोट्यावधी नागरिकांच्या सह्यांचं निवेदन राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश...