November 1, 2025 3:20 PM November 1, 2025 3:20 PM

views 25

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार असून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सर्व पक्षांचे उमेदवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर रालोआ आणि महाआघाडीचे नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.   बिहारमधे रालोआची लाट असून यावेळीही राज्यात राओलाचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे प्रमुख चिराग पासवान यांनी व्यक्त केला. तर महाआघाडी गुन्हेगारांना पाठिंबा देत असल्याचा आरोप भाजपा ...

March 1, 2025 3:27 PM March 1, 2025 3:27 PM

views 15

विधानसभेत काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची नियुक्ती

काँग्रेसचे विधानसभेतले मुख्य प्रतोद म्हणून आमदार अमित देशमुख यांची तर प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते म्हणून अमीन पटेल तर सचिव म्हणून विश्वजित कदम यांची नियुक्ती झाली आहे.   विधानपरिषदेचे गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रतोदपदी अभिजीत वंजारी तर प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानं ही नियुक्ती झाल्याचं काँग्रेसने पत्रकाद्वारे...

November 29, 2024 8:29 PM November 29, 2024 8:29 PM

views 12

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

ओदिशा पाठोपाठ, हरियाणा, आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय हा लोकांचा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवरचा विश्वास दर्शवतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज भुवनेश्वरमध्ये बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ त्यांची एक सभा झाली. केंद्रातलं भाजपा सरकार ओदिशाला प्राधान्य देत असून ओदिशामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यावर लगेच महिलांसाठी सुभद्रा योजनेसारखी अनेक मोठी पावलं उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधक...

October 18, 2024 3:21 PM October 18, 2024 3:21 PM

views 16

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.या काळात कुठंही गैरप्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन सज्ज आहे. रायगडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली.या कारवाईत एकूण २ लाख ७१ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

September 24, 2024 4:53 PM September 24, 2024 4:53 PM

views 14

देशाला समृद्ध आणि विकसित बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

देशाला समृद्ध आणि विकसित बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं असल्याचं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल देशातल्या लोकप्रतिनिधी गृहांच्या पदाधिकाऱ्यांची १० वी परिषद सुरू आहे. यात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासा संदर्भात विधानमंडळाची भूमिकाया विषयावर आपलं मत मांडताना नार्वेकर बोलत होते. महाराष्ट्र हे वेगानं नागरीकरण होणारं राज्य असल्याचं नार्वेकर म्हणाले. राज्यात सार्वजनिक वाहतुकीचं विस्तारित जाळं, इलेक्ट्रिक वाहनं, गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात ...