March 9, 2025 1:29 PM March 9, 2025 1:29 PM

views 12

मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांची शोधमोहिम

मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री जप्त केली. मणिपूरमध्ये जिरीबाम, तेंग्नोपाल, काकचिंग, उखरुल, इम्फाळ पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगराळ तसंच सखल भागातल्या जिल्ह्यांमध्ये मणिपूर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपीच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २५ शस्त्रं, आयईडी, ग्रेनेड, दारुगोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली. तसंच, कांगपोकपी जिल्ह्यातले बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले. 

August 16, 2024 8:28 PM August 16, 2024 8:28 PM

views 10

आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या शोधमोहिमेत शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा जप्त

मणिपूरमधे कांगपोकपी जिल्ह्यात आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त पथकानं एक शोधमोहिम राबवून काही शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा जप्त केला. लॉयचिंग रिज भागात काही समाजकंटकांनी हा दारुगोळा लपवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर या संयुक्त पथकानं ही शोधमोहिम राबवली.