June 8, 2025 7:42 PM June 8, 2025 7:42 PM

views 13

आसाममध्ये पुरस्थितीत सुधारणा

आसाममधल्या पुरस्थितीत आज आणखी सुधारणा झाली आहे. मात्र ३० हजाराहून अधिक स्थानिक अजूनही छावण्यांच्या आश्रयाला असून १२ जिल्ह्यांमधल्या ९०० गावांमधले ३ लाखाहून अधिक नागरिक महापुरात अडकलेले आहेत. ब्रह्मपुत्रेचा पूर ओसरला असला तरी अन्य नद्या मात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. महापुरात अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य सुरु आहे. आसामच्या केचर, श्रीभूमी तसंच हेलकंदी जिल्ह्यातल्या तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

June 6, 2025 3:36 PM June 6, 2025 3:36 PM

views 12

आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर

आसाममध्ये पूरस्थिती काहीशी ओसरली असली तरीही अद्याप १६ जिल्ह्यांमध्ये ५ लाख ६० हजारांहून अधिक जण पुरात अडकले आहेत. राज्यातल्या चौदाशे गावांना पुराचा फटका बसला असून सुमारे १ हजार ९०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे.   राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं १७५ मदत छावण्या सुरू केल्या असून त्यात ४१ हजारांहून अधिक जणांनी आश्रय घेतला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या चोवीस तासात राज्याच्या बहुतांश भागात मध्यम प्रमाणात पाऊ...

June 3, 2025 8:15 PM June 3, 2025 8:15 PM

views 13

आसाममधे पूरस्थिती गंभीर, राज्यात २२ जिल्ह्यांमधल्या ५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका, पुरामुळे अकरा जणांचा मृत्यू

आसाममधल्या पूरस्थितीनं आणखी गंभीर रूप घेतलं असून, राज्याच्या ५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातली १ हजार २५० पेक्षा जास्त गावं पुरामुळे बाधित झाली असून, १२ हजार ६०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्रा, बराक आणि या नद्यांच्या सर्व उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. पूरग्रस्त नागरिकांसाठी राज्य सरकारनं १६५ मदत छावण्या आणि १५७ मदत केंद्र उघडली आहेत. पूरग...

July 9, 2024 8:14 PM July 9, 2024 8:14 PM

views 14

आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ वर

आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ वर गेली आहे.  राज्यात २७ जिल्ह्यांमधल्या २२ लाख नागरिकांना अजूनही पुराचा धोका आहे. पुरामुळे ४९ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. १२७ रस्ते आणि २ पुलांचंही नुकसान झालं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांनी काल २१८ जणांची सुटका केली. ब्रह्मपुत्रा, आणि बराक, तसंच त्यांच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.  राज्य सरकारनं २४५ मदत शिबिरं आणि २९८ मदत वाटप केंद्र स्थापन केली आहेत. सध्या ५३ हजारांपेक्षा जास्त नागरिक मदत शिबिरांम...