August 22, 2024 6:01 PM

views 12

आसाममध्ये मुस्लिम विवाह, घटस्फोट नोंदणी कायदा आणि नियम रद्द करण्यासाठीचे विधेयक मंजूर

आसाममध्ये राज्य मंत्रिमंडळानं काल मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी अधिनियम १९३५ मधली बाल विवाहाशी संबंधित नियमावली रद्द करण्यासाठी  विधेयक आणायला  मंजुरी दिली. या नियमावलीमध्ये विशिष्ट परिस्थितीत अल्पवयीन मुलींच्या विवाहाला मंजुरी देण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळानं या वर्षाच्या सुरुवातीला ही नियमावली रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे नियम रद्द करण्यासाठी विधेयक मांडण्यावर सहमती झाली. आसामच्या कन्या आणि भगिनींना न्याय देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं आसामचे मुख्यमंत्री ...