May 17, 2025 1:57 PM May 17, 2025 1:57 PM
4
ईशान्य भारतात पुढले ७ दिवस वादळी पावसाची शक्यता
ईशान्य भारतात पुढले सात दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय मध्ये आज जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल, तर आंध्रप्रदेशची किनारपट्टी, कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करैकल आणि तेलंगणात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि नैर्ऋत्य उत्तर प्रदेशाच्या काही भागात आज उष्णतेची लाट राहील. बिहार आणि ओदिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील, तर पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी धुळीचं वादळं येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  ...