September 22, 2025 1:32 PM September 22, 2025 1:32 PM
12
आसाममध्ये बोडोलँड प्रदेशातल्या ४० सदस्यीय कौन्सिलच्या निवडीसाठी मतदान
आसाममधे बोडोलँड प्रदेशातल्या चाळीस सदस्यीय कौन्सिलच्या निवडीसाठी आज मतदान सुरू आहे. या प्रदेशात कोकराझार, बक्सा, चिरांग, उदलगुरी आणि तमुलपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. सकाळी साडे सात वाजता मतदानाला सुरुवात झाली, दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होईल. या निवडणुकीत ३१६ उमेदवार असून २६ लाख मतदान मतदानाचा हक्क बजावत आहेत.