April 28, 2025 1:35 PM

views 16

आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताची 83 सुवर्ण पदकांची कमाई

दिल्लीमध्ये काल झालेल्या आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारतानं निर्विवाद वर्चस्व राखत ८३ सुवर्ण पदकांची कमाई केली. दुसरं स्थान मिळवणाऱ्या जपानच्या खात्यात ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कास्यपदकं जमा झाली. मोंगोलिया, ओमान आणि नेपाळच्या संघांनी पहिल्या पाचात स्थान मिळवलं. २१ देशांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.