October 28, 2025 2:52 PM October 28, 2025 2:52 PM

views 24

जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजीत कलकलनं पटकावलं सुवर्णपदक

सर्बिया इथं काल झालेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजीत कलकलने पुरुषांच्या ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने विजेतेपदाच्या लढतीत उझबेकिस्तानच्या खेळाडूचा १०-० असा पराभव केला. यापूर्वी, भारतीय महिला कुस्ती संघानं पाच कांस्य आणि दोन रौप्य पदके जिंकली असून सांघिक विजेतेपदही पटकवले आहे.

March 30, 2025 9:01 PM March 30, 2025 9:01 PM

views 8

Asian Wrestling Championship: कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया अंतिम फेरीत

जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरु आशियाई कुश्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया यांनी फ्रीस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उदितने चीनच्या वानहाओ झोउचा २-० असा पराभव केला.  तर दीपक पुनियाने जपानच्या ताकाशी इशिगुरोचा ८-१ असा पराभव केला. पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये ८६ किलो वजनी गटात मुकुल दहियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

March 28, 2025 12:31 PM March 28, 2025 12:31 PM

views 7

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला १ रौप्य आणि २कास्य पदकांची कमाई

जॉर्डनमधील अमन इथं झालेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला १ रौप्य आणि २कास्य पदकांची कमाईत भारतानं काल एक रौप्य आणि 2 कास्य पदकांची कमाई केली आहे. काल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 76 किलो वजनी गटात भारताच्या ऋतिका हुड्डाला रौप्य तर 59 किलो वजनी गटात मुसकान आणि 68 किलो वजनी गटात मानसी लाथेर यांनी कास्य पदक मिळवलं. या स्पर्धेत भारतानं आत्तापर्यंत 5 पदकं जिंकली आहेत यात 1 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे.