March 31, 2025 1:13 PM March 31, 2025 1:13 PM

views 4

Asian Wrestling Championship : कुस्तीपटू दीपक पुनिया आणि उदित यांना रौप्य पदक

जॉर्डनची राजधानी अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाइल प्रकारात दीपक पुनिया आणि उदित यांनी काल रौप्य पदके पटकावली. दिनेशने 125 किलो वजनी गटात तुर्कमेनिस्तानच्या झियामुहम्मत सपारोव्हला नमवत कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने दहा पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे.