March 7, 2025 8:44 PM March 7, 2025 8:44 PM

views 5

भारतीय महिला संघ आशियाई कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

सहाव्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत नेपाळच्या संघाला भारतीय महिलांना ५६-१८ असं नमवलं. सध्या इराण आणि बांग्लादेश यांच्यात उपांत्य फेरीतला सामना सुरू आहे. गेल्यावेळी झालेल्या या स्पर्धेत कोरियाला नमवून भारतीय संघानं अजिंक्यपदक पटकावलं होतं.