August 26, 2024 1:08 PM August 26, 2024 1:08 PM
11
आशिया सर्फिंग अजिंक्यपद स्पर्धेतल्या मारुहाबा चषक स्पर्धेत भारताची रौप्य पदकाला गवसणी
मालदीवच्या थुलुसधू इथं झालेल्या आशियाई सर्फिंग अजिंक्यपद २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारुहाबा कप या सांघिक स्पर्धेत भारतानं आज रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून जपान ५८ पूर्णांक ४० गुणांसह प्रथम स्थानी आहे, तर भारत २४ पूर्णांक १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तैपेई २३ पूर्णांक ९३ गुणांसह तिसऱ्या तर चीन २२ पूर्णांक १० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारा हरीश मुथू पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.