September 6, 2025 3:11 PM September 6, 2025 3:11 PM

views 18

आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये भारताचा सामना चीनविरुद्ध होणार

आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारताचा सामना चीनविरुद्ध होणार आहे. आत्तापर्यंत भारतानं एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे. सुपर फोरच्या पदकतालिकेत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजेय राहिल्यानं आशिया करंडकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात कोरियासमोर मलेशियाचं आव्हान असणार आहे.

December 7, 2024 7:54 PM December 7, 2024 7:54 PM

views 12

मस्कत इथं आजपासून कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धा सुरू

ओमानची राजधानी मस्कत इथं आजपासून कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चीननं बांगलादेशचा १९ - ० असा दणदणीत पराभव केला. भारतीय महिला संघाचा पहिला सामना ज्योती सिंह हिच्या नेतृत्वाखाली उद्या बांगलादेशाच्या संघाबरोबर होणार आहे.    पुढच्या वर्षी चिली देशात होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ हॉकी विश्व कप स्पर्धेची पात्रता फेरी म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ तारखेला होणार असून स्पर्धेतले सर्वोत्तम ५ संघ कनिष्ठ विश्व कप स्पर्धेसाठी ...

December 2, 2024 7:56 PM December 2, 2024 7:56 PM

views 10

पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात उद्या उपांत्य फेरीचा सामना

पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात उद्या उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं ओमान स्टेडियमवर संध्याकाळी साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीतला दुसरा सामना पाकिस्तान आणि जपान यांच्यात उद्या होणार आहे. तर या स्पर्धेतला अंतिम सामना ४ डिसेंबर रोजी होईल.    काल झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा ८-१ असा पराभव केला. यात अर्शदीप सिंगने हॅटट्रिक नोंदवली. तर अरैजीत सिंग हुंदल याने भारतासाठी दोन गोल केले.

November 19, 2024 7:47 PM November 19, 2024 7:47 PM

views 7

महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल

महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघानं आज प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारतानं जपानवर २-० अशी मात केली. अंतिम फेरीत भारताची गाठ चीनशी पडेल. उपांत्य फेरीत चीननं मलेशियाला ३-१ असं नमवलं. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या संध्याकाळी बिहारमध्ये राजगीर हॉकी मैदानावर पावणेपाच वाजता सुरू होईल.

September 16, 2024 10:17 AM September 16, 2024 10:17 AM

views 13

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा दक्षिण कोरियाशी सामना

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्यफेरीत चीनच्या हुलुनबुर येथे आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारत हा एकमेव अपराजित संघ आहे. भारताने या स्पर्धेत चीनचा 3-0, जपानचा 5-1, मलेशियाचा 8-1, कोरियाचा 3-1 आणि पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना चीनशी होणार आहे.