October 28, 2025 2:39 PM

views 47

भारताच्या धिनिधी देसंगुचा चारशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत नवा विक्रम

बहारीन इथं आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या धिनिधी देसंगु  हिने चारशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. धिनिधीने हे अंतर चार मिनिट २१ सेकंद ८६ मिनीसेकंदात पार करत अंतिम फेरीत पाचवं स्थान पटकावलं. तसंच स्वतःचाच चार मिनिट २४ सेकंद ६० मिनीसेकंदाचा विक्रम मोडीत काढला. याच स्पर्धेत भारताच्याच अदिती हेगडेनं चारशे मीटरचं अंतर चार मिनिट ३२ सेकंदात पार करत सातवं स्थान पटकावलं.     पुरुषांच्या जलतरण स्पर्धेत भारताच्या नितीशसाई हरिनाथ याने ५० मीटरचं अंतर २३ सेकंद...

January 8, 2025 3:58 PM

views 17

भारतीय अँथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून बहादूर सिंग सागू यांची निवड

पुरुषांच्या शॉट पुट मधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन ‘बहादूर सिंग सागू’ यांची भारतीय अँथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. चंदीगड इथं काल सुरु झालेल्या महासंघाच्या दोन दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली.

June 29, 2024 10:03 AM

views 20

योगाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याचा निर्णय – मनसुख मांडवीय

योगाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याच्या निर्णयाचं केंद्रिय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी स्वागत केलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर पी टी उषा यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं पत्र त्यांनी आशियाई ऑलिम्पिक मंडळाचे अध्यक्ष राजा रणधीर सिंग यांना नुकतंच पाठवलं आहे.