November 14, 2025 8:58 PM November 14, 2025 8:58 PM

views 18

आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताची ऐतिहासिक दिवसाची नोंद

ढाका इथं आयोजित आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतानं आज रिकर्व्ह प्रकारात दोन वैयक्तिक आणि एक सांघिक सुवर्णपदक जिंकलं आहे. महिलांच्या गटामध्ये रिकर्व्ह प्रकारात अंकिता भकत हिने कोरियाच्या सुह्योन नाम हिच्यावर ७-३ असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकल. तर पुरुषांच्या गटात रिकर्व्ह प्रकारात धीरज बोम्मदेवराने भारताच्याच राहुल याला ६-२ने पराभूत करत सुवर्णपदक जिंकलं. या विजयानंतर राहुल हा रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे. रिकर्व्ह प्रकाराच्या पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत यशदीप भोगे, अतानु दास आणि राहुल यांच्या संघान...

November 12, 2025 7:41 PM November 12, 2025 7:41 PM

views 9

Archery Championships: भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपशिखा अंतिम फेरीत

ढाका इथे झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाउंड मिश्र प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांनी कझाकस्तानचा १५६-१५३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.  सुवर्ण पदकासाठी उद्या भारताचा सामना बांगलादेशशी होईल. रिकर्व्ह प्रकाराच्या सांघिक स्पर्धेत अंशिका कुमारी आणि यशदीप भोगे परवा कोरियाविरुद्ध कांस्य पदकासाठी लढत देतील.