November 28, 2025 1:38 PM November 28, 2025 1:38 PM
4
जागतिक शक्ति निर्देशांकावर आधारित क्रमावारीत भारत तिसऱ्या स्थानी
जागतिक शक्ति निर्देशांकावर आधारित क्रमावारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. पहिलं स्थान अमेरिकेला तर दुसरं चीनला मिळालं आहे. ऑस्ट्रेलियातल्या लोवी संस्थेमार्फत हे सर्वेक्षण करुन मानांकन दिलं जातं. राष्ट्रांचा आपापल्या खंडातला प्रभाव,आणि जगावर प्रभाव टाकण्याची क्षमता, सामरिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक प्रभाव अशा १३१ निकषांवर आधारित हे मानांकन दिलं जातं.