December 9, 2024 10:05 AM December 9, 2024 10:05 AM
5
श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत भारताला ५५ पदकं
श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या आशिया पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मलेशियात क्वालालंपूर इथं पार पडलेल्या या स्पर्धेत भारताला 55 पदकं मिळाली. यामध्ये 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 29 कांस्य पदकांचा समावेश आहे. मैदानी स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण पदकं पटकावली. केंद्रिय मंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन करुन च्याचं यश देशासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे. या स्पर्धेत 62 पदकं मिळवत इराणनं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं.