October 13, 2024 1:25 PM October 13, 2024 1:25 PM

views 11

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह इथं आज संध्याकाळी साडेसातला हा सामना सुरू होईल. अंतिम फेरीतील चार संघात स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.

July 20, 2024 9:14 AM July 20, 2024 9:14 AM

views 18

टी- ट्वेंटी महिला क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत काल आपल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेतल्या दांबुला इथे काल झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाला १०९ धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघानं पंधराव्या षटकात तीन बळींच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केलं. भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे.

July 18, 2024 3:05 PM July 18, 2024 3:05 PM

views 11

महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा उद्या दाम्बुला इथं सुरू

महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा उद्या श्रीलंकेत दाम्बुला इथं सुरू होत आहे. सलामीचा सामना गट ‘अ’ मधल्या नेपाळ आणि संयुक्त अरब अमीराती या संघात होणार आहे. त्यानंतर गतविजेता भारतीय संघाची लढत क्रिकेटमधला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. भारतीय महिला संघाने २०१८ चा अपवाद वगळता टी ट्वेंटी क्रिकेटच्या सर्व मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे आपलं जेतेपद राखण्याचं आव्हान भारतासमोर असेल. मालिकेतले सर्व सामना रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.