November 8, 2025 8:18 PM November 8, 2025 8:18 PM

views 24

आशिया चषक स्पर्धेच्या चषकासंबंधीचा वाद संपवण्याची दोन्ही बाजूंची तयारी

नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या चषकासंबंधीचा वाद संपवण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दाखवली आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली आहे. दुबई इथं झालेल्या आयसीसी मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याशी याबाबत सौहार्दपूर्ण चर्चा झाली असून दोन्ही देश काही पर्याय समोर ठेवतील आणि त्यानुसार हा तिढा लवकरात लवकर सोडवला जाईल, असं आश्वासनही सैकिया यांनी दिलं.

September 26, 2025 9:28 AM September 26, 2025 9:28 AM

views 17

आशिया करंडक क्रिकेटचा अंतिम सामना भारत-पाकिस्तान दरम्यान होणार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत काल पाकिस्ताननं बांगलादेशचा १४ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं २० षटकांत ८ बाद १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ १२४ धावा करू शकला. अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात परवा २८ तारखेला खेळला जाईल.

September 21, 2025 2:40 PM September 21, 2025 2:40 PM

views 75

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या या आधीच्या सामन्यात सहज विजय नोंदवला आहे. हा सामना जिंकल्यास भारताला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल. अंतिम सामना येत्या २८ डिसेंबरला होणार आहे. सुपर फोर गटामध्ये काल झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला.  

September 20, 2025 10:57 AM September 20, 2025 10:57 AM

views 149

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत सुपर फोरमध्ये दाखल

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल अबुधाबी इथं झालेल्या अ गटातील अंतिम साखळी सामन्यात भारतीय संघानं ओमानचा 21 धावांनी पराभव केला. भारतानं ओमानपुढं विजयासाठी 20 षटकांत 189 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ओमानचा संघ 4 गड्यांच्या बदल्यात केवळ 167 धावा करू शकला.   अर्शदीप सिंग 64 सामन्यांमध्ये 100 आंतरराष्ट्रीय टी-20 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. या स्पर्धेत भारतानं यापूर्वी जिंकलेल्या दोन सामन्यांसाठी चार गुण मिळवून सुपर 4 मध्ये पोहोचला आहे. ओमानचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.