October 1, 2024 7:23 PM October 1, 2024 7:23 PM
25
मुंबईत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली वाडीबंदर कोचिंग डेपोची पाहणी
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वाडीबंदर कोचिंग डेपोची पाहणी केली. पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि डेपोच्या भविष्यातल्या विस्तार योजनांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. बेस्ट फ्रॉम वेस्ट या प्रदर्शनात त्यांनी कचरा संकलन विषयीच्या नव्या कल्पनांचं त्यांनी कौतुकही केलं. वंदे भारत या रेल्वेगाडीसाठी आवश्यक सुट्या भागांची साठवण असलेल्या वंदे भारत स्टोअरलाही यावेळी रेल्वे मंत्र्यांनी भेट दिली.