November 4, 2024 9:23 AM

views 15

पुढील पाच ते सात वर्षांत देशातील रेल्वे प्रवासात अभूतपूर्व बदल होणार- रेल्वेमंत्री

नवीन तंत्रज्ञान, रेल्वेसाठी आधुनिक घटक आणि आगामी वर्षात पूर्ण हॉट असलेलं रेल्वेचं विद्युतीकरण यामुळे येत्या पाच ते सात वर्षांत देशातील रेल्वे प्रवासात अभूतपूर्व बदल होणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल कोझिकोडमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.   अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत, 1 लाख कोटी रुपये खर्चून 1334 स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यापैकी 1100 स्थानकांमध्ये बांधकाम प्रगतीपथावर असल्याचं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. देशातील स...

October 10, 2024 2:33 PM

views 14

भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट – अश्विनी वैष्णव

भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यतेने परीपूर्ण असलेल्या भारतीय सिनेमाने देशाला एकत्र करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका लेखात केलं आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत हा दृष्टीकोन अधिक बळकट करण्यात सिनेमा हे एक शक्तीशाली साधन आहे, असं वैष्णव म्हणाले. सिनेमा भाषिक आणि प्रादेशिक सीमा ओलांडतो, तसंच जनतेच्या सामायिक भावना आणि अनुभव चितारतो असं वैष्णव यांनी सांगितलं. भारतीय सिनेमाल जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही वैष्णव म्हण...

October 4, 2024 7:08 PM

views 22

रेल्वेचं खासगीकरण होणार नाही- रेल्वेमंत्री

  कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ते आज नाशिकमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या चाळिसाव्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात संचलनाचं निरीक्षण केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. रेल्वे सुरक्षा बलाच्या विभागीय प्रशिक्षण केंद्रांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही वैष्णव यांनी केली. या केंद्रांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या सोयीसुविधांवर विशेष भर देण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे सुरक्षा बलाच्या तमिळनाडू इथल्या श्वानपथक विभागीय ...

September 18, 2024 7:28 PM

views 21

पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

पीएम आशा अर्थात पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रीमंडळाची आज मंजुरी मिळाली. दाळी, तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह यात किमान आधारमूल्य आणि बाजार भाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवणं, ग्राहकांसाठी बाजारभाव स्थिर ठेवणं यावर यात भर दिला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात यासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  रबी हंगामाकरता २४ हजार ४७५ कोटी रुपयांच्या पोषण मूल्य आधारित खतांच्या सबसिडीला केंद्...

August 9, 2024 3:54 PM

views 11

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच बैठक घेणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवेदन दिलं होतं. कोकण रेल्वेच्या मार्गावरून दरवर्षी सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर एकच ट्रॅक असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या ...

July 24, 2024 6:48 PM

views 26

महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद केली असून राज्यातल्या अनेक रेल्वे प्रकल्पांची कामं हाती घेतल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी दरवर्षी सरासरी १ हजार १७१ कोटी रुपयांची तरतूद होत होती. गेल्यावर्षी ही तरतूद साडे १३ हजार कोटींहून अधिक होती, असं ते म्हणाले. युपीएच्या काळात सरासरी ५८ किलोमीटरचे रेल्वेमार्ग बांधले गेले. गेल्या १० वर्षात हे प्रमाण सरासर...

July 20, 2024 12:23 PM

views 18

सरकारी तंत्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न-अश्विनी वैष्णव

केंद्र सरकार विविध उपक्रमांद्वारे शासकीय तंत्रशिक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. वैष्णव यांनी काल मुंबईत महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली, या बैठकीदरम्यान ते बोलत होते. या क्षेत्रातील नवनवीन कल्पनांचे प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन त्यांनी सरकारी तांत्रिक अभियांत्रिकी संस्थांना यावेळी केलं. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत उभारण्यात येणाऱ्य...

July 3, 2024 1:43 PM

views 16

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणं हा भारताचा दृष्टिकोन – मंत्री अश्विनी वैष्णव

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा वापर करून तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणं, हा भारताचा दृष्टिकोन असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार लवकरच भारत ए आय मोहीम सुरु करणार असून त्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय एक ए आय नवोन्मेष केंद्र देखील स्थापन केलं जाईल, ज्यामुळे उ...

June 19, 2024 8:53 PM

views 16

खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची १४ पीकांच्या MSPला मंजुरी

खरीप हंगामासाठी १४ पीकांसाठीच्या MSP अर्थात किमान आधारभूत किंमतीला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही किंमत किमान ५० टक्क्यांनी अधिक असेल याची खबरदारी घेतल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. धान, कापूस, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, मूग, तूर, उडीद यासारख्या धान्यांचं किमान आधारभूत मूल्य मंत्रीमंडळानं आज मंजूर केलं. यामुळं शेतकऱ्यांना एकूण २ लाख कोटी रुपयांचा लाभ मिळेल, असं ते म्हणाले.   वाढवण बंदराच्या उभारणीलाही परवानगी...