May 3, 2025 1:25 PM

views 21

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी- अश्वीनी वैष्णव

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी मुंबईत आयोजित वेव्हज परिषदते सांगितलं.    अनेक जागतिक कंपन्यांनी या संदर्भात भारतासोबत काम करण्याची तयारी दर्शविली असून गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह सात जागतिक कंपन्यांनी वेव्हज परिषदेदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू देखील यावेळी उपस्थित होते.

April 2, 2025 1:29 PM

views 9

नवीन युगात केवळ कायदा पुरेसा असू शकत नाही-अश्विनी वैष्णव

नवीन युगात केवळ कायदा पुरेसा असू शकत नाही, गुन्हेगारी रोखण्यासाठी तांत्रिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या ६२व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली इथं काल आयोजित करण्यात आलेल्या २१व्या डी. पी. कोहली स्मृति व्याख्यानमालेत ते बोलत होते.   नवीन युगातील आव्हानं विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सीबीआयनं स्टार्टअप्स, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांकडे अधिक सहकार्यान...

March 27, 2025 10:58 AM

views 25

३ वर्षात देशात १५००पेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित

केंद्र सरकारच्या सत्यशोधक पथकाने गेल्या तीन वर्षात देशात दीड हजारपेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित झाल्याचा शोध लावला आहे.   केंद्रीय महाइति आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत सांगितल की यासंदर्भात 72 हजारांपेक्षा जास्त तक्रारी पात्र सूचना कार्यालयाला मिळाल्या असून, त्यांच सत्यता शोधक पथक बाटमयांच्या सत्यतेचा तपास करू त्याबद्दलची माहिती आपल्या सोशल मीडियावरुंन देते.   नागरिकांनी सरकारशी संबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांविषयी आपल्या तक्रारी असल्यास 87 99 71 12 59 या...

February 10, 2025 3:35 PM

views 26

भारतानं आयफोनच्या निर्यातीत ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा टप्पा

भारतानं चालू आर्थिक वर्षात आयफोनच्या निर्यातीत एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.   याचं श्रेय सरकारच्या उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला त्यांनी दिलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात सव्वा दोन लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

February 5, 2025 8:21 PM

views 20

जागतिक पातळीवर एआयच्या वापराची स्पर्धा तीव्र होत असून भारताने यासंबंधात व्यापक धोरण आखणार – मंत्री अश्विनी वैष्णव

जागतिक पातळीवर एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची स्पर्धा तीव्र होत असून भारताने यासंबंधात व्यापक धोरण आखल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांची नवी दिल्लीत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एआय संदर्भातलं पुढचं धोरण तयार करण्याच्या मुद्द्यावर ऑल्टमन यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून ऑल्टमन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तंत्रज्ञानविषयक धोरणाचं कौतुक केलं आहे, असं वैष्णव यांनी समाजमाध्यमावरच्...

January 19, 2025 3:12 PM

views 7

जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसला रवाना

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं उद्यापासून सुरु होणाऱ्या, जागतिक आर्थिक मंच २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. प्रगतीपथावर मागे पडलेल्या वर्गांसह समाजातल्या सर्व स्तरांच्या विकासासाठी देशानं अनेक पावलं उचलली आहेत, असं वैष्णव यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी सांगितलं.   पाच दिवसांच्या जागतिक आर्थिक मंच कार्यक्रमात, समावेशक विकास तसंच सामाजिक, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचं लोकशाहीक...

January 12, 2025 9:25 AM

views 24

पुणे जिल्ह्यातील रांजणगांव इथं इलेक्ट्रानिक क्लस्टरची स्थापना करण्यात येणार

सीडॅकने विकसित केलेल्या तेजा जेएएस ६४ या चीपचं आणि नोवा डेव्हलपमेंट बोर्डचं उद्घाटन आज केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. त्यांनी आज पुण्यातल्या सी-डॅक अर्थात प्रगत संगणक विकास संस्थेच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली.  यावेळी त्यांनी केंद्रातल्या शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. सीडॅक मधील सुपर काॅम्पुटर तंत्रज्ञान विकासासाठी आणि औद्योगिक कंपन्यांना आवश्यक चीप आणि अन्य तांत्रिक उपकरणांच्या विकासाबाबत सीडॅकमध्ये सुरू असल...

January 11, 2025 3:38 PM

views 15

अश्विनी वैष्णव यांनी सी-डॅक प्रदर्शनाला दिली भेट

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्यातल्या सी-डॅक अर्थात प्रगत संगणक विकास केंद्राच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातल्या शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.   प्रगत संगणक तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी सी-डॅक आधीपासून काम करत असल्याचं त्यांनी वेळी सांगितलं. देशातल्या सर्व शाळा- महाविद्यालयांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भर देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

January 8, 2025 10:31 AM

views 10

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सरकारी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचं अनावरण

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल दिल्लीत केंद्र सरकारच्या नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन करण्यात आलं. परिवर्तनवादी प्रशासनाच्या तत्वांना अधोरेखित करणारी जनभागीदारी से जनकल्याण ही नव्या दिनदर्शिकेची संकल्पना आहे.   गेल्या दशकभरात विविध क्षेत्रात परिवर्तनात्मक प्रशासनाच्या दृश्य प्रभावावर या दिनदर्शिकेत प्रकाश टाकण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती प्रसारण सचिव संजय जाजू आदी मान्यवर उपस्थित होते.

November 27, 2024 6:25 PM

views 13

भारतीय रेल्वेचं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू – रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वेनं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू केलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हाय स्पीड रेल्वेची रचना तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा उत्पादन खर्च प्रति डब्बा सुमारे २८ कोटी रुपये आहे. दुसऱ्या एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा वेग कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.