January 2, 2026 3:28 PM

views 20

महाराष्ट्रासह ८ राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्पाचे २२ प्रस्ताव मंजूर

इलेक्ट्रॉनिक्स भाग उत्पादन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने  २२ नवीन प्रस्ताव  मंजूर केले असून नवीन वर्षात देशामध्ये ४ नवे सेमिकंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरु होत असल्याची घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. यासंबंधात नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज ते बोलत होते.  याच्या आधीही सरकारने २४ प्रकल्पांना मंजुरी दिली होती.   या प्रकल्पांमध्ये ४१ हजार ८६३ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून मोबाईल उत्पादन, दूरसंचार, ग्राहकोपयोगी आणि...

November 17, 2025 9:27 AM

views 34

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं मत

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन,  प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यावेळी उपस्थित होत्या.   पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता हवी, तसंच सत्याचा शोध घेण्याचं धैर्य हवं असं रंजना प्रकाश देसाई यावेळी म्हणाल्या.

September 17, 2025 3:23 PM

views 25

सरकारने गेल्या ११ वर्षांत देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावला- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावला आहे. या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. मोदी यांचा जागतिक पातळीवरचं प्रभावशाली व्यक्तिमत्व बनण्याचा प्रवास असाधारण आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाविषयी गौरवोद्गार काढले आहेत.    केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केलं. याच निमित्ताने नवी दिल्ल...