October 2, 2025 11:21 AM October 2, 2025 11:21 AM
47
केंद्रीय मंत्रिमंडळाने, डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर अभियानाला मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने, डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर अभियानाला काल मंजुरी दिली. देशांतर्गत डाळीच्या उत्पादनात वाढ करणे आणि स्वयंपूर्ण होणं असा या अभियानाचा उद्देश आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. 2025 ते 2031 या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये हे अभियान राबवले जाणार असून, त्यासाठी 11 हजार 440 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय, 2026-27 सालच्या विपणन हंगामासाठी सर्व अनिवार्य रबी पिकांच्या किमान ...