December 6, 2024 8:17 PM December 6, 2024 8:17 PM

views 3

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन

ईशान्य भारतातल्या आठ राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा अष्टलक्ष्मी महोत्सव हा ईशान्य भारतातील उत्पादन आणि सेवा देश आणि जगासमोर प्रदर्शित करण्याचा पहिला मोठा प्रयत्न आहे. जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी इथे मोठ्या संधी उपलब्ध होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातल्या राज्यांमधला हिंसाचार कमी होत असून पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भावी ...

December 6, 2024 3:21 PM December 6, 2024 3:21 PM

views 2

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी नवी दिल्ली इथं अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उदघाटन करणार आहेत. भारत मंडपम इथं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या आठ राज्यांमधले अडीचशे कारागीर सहभागी होणार आहेत. यात ग्रामीण हाट बाजाराचं आयोजन होणार असून त्यात कारागीर, उद्योजक आणि शेतकरी आपल्या  हस्तकला, हातमाग वस्त्रे, पर्यटन स्थळे तसेच विशेष कृषी उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करणार आहेत. यात जी आय टॅग मिळालेल्या ३४ उत्पा...