November 30, 2024 3:33 PM November 30, 2024 3:33 PM
10
अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मुंबईत विले पार्ले इथं काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर, शंकर महादेवन, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि सयाजी शिंदे यांना देखील राज्यपालांच्या हस्ते नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारानं गौरवण्यात आलं.