May 10, 2025 8:19 PM May 10, 2025 8:19 PM

views 17

मुंबईतील गोखले पूलाचे उदघाटन पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार

मुंबईत अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाचं लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी होणार आहे.   पश्चिम उपनगरातली वाहतूककोंडी फोडणारा हा पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं खुला झाल्यानं या भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

March 18, 2025 7:29 PM March 18, 2025 7:29 PM

views 12

राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार

राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार आहे, असं सांस्कृतिक कार्य मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी आज विधानसभेत जाहीर केलं. राज्याच्या राजधानीत वांद्रे- कुर्ला संकुलात उभारलेल्या या वास्तूमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण साध्य होईल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

January 18, 2025 3:25 PM January 18, 2025 3:25 PM

views 12

गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठित केल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातले किल्ले आणि गडावर अतिक्रमण होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं.   त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकारी, वनक्षेत्र असेल...

November 4, 2024 3:34 PM November 4, 2024 3:34 PM

views 12

…तर पटोले यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करू – आशिष शेलार

रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यावरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बेछूट आरोप केले. मात्र, त्याचे पुरावे नसतील तर आज नाना पटोले यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, अशी माहिती भाजपाचे आमदार आणि मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.

September 23, 2024 3:10 PM September 23, 2024 3:10 PM

views 4

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर पक्षीय राजकारणाचा प्रभाव नसावा – आशिष शेलार

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर पक्षीय राजकारणाचा प्रभाव नसावा असं मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचं हित जोपासणारे असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीत राजकीय पक्षांचे झेंडे दिसू नयेत अशी विनंती आपण कुलगुरुंकडे केली असल्याचं ते म्हणाले.   अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या आरोपा...

August 7, 2024 3:54 PM August 7, 2024 3:54 PM

views 5

भाजपा आमदार आशीष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत काँग्रेस नेत्यांना भेटायला जातात, मात्र महाराष्ट्रातले प्रश्न मांडत नाहीत, अशी टीका भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. राज्यातले नेते दिल्लीला गेले तर ठाकरे टीका करतात, पण स्वतः काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात असंही शेलार म्हणाले.