June 12, 2025 3:08 PM June 12, 2025 3:08 PM
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला ५ हजार २०० विशेष बस सोडणार
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी यात्रा काळात राज्य परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बस सोडणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते काल पंढरपूर इथं एसटी अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केली तर पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यात्राकाळात होणारी गर्दी लक्षात घेत प्रवाशांच्या सोयीसाठी...