July 8, 2025 6:51 PM July 8, 2025 6:51 PM

views 15

पंढरपुरात एकादशी दिवशी २७ लाखापेक्षा जास्त वारकरी दाखल

यंदा आषाढीवारीतल्या गर्दीनं उच्चांक गाठला असून, पंढरपुरात एकादशी दिवशी २७ लाखापेक्षा जास्त वारकरी दाखल झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे. यंदा ड्रोनच्या माध्यमातून एआय प्रणालीव्दारे जमलेल्या गर्दी विश्लेषण करण्यात आलं. त्यात ही माहिती समोर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

June 23, 2025 7:02 PM June 23, 2025 7:02 PM

views 6

आषाढीवारी स्वच्छ आणि सुंदर करण्यावर प्रशासनानं भर

आषाढीवारी स्वच्छ आणि सुंदर करण्यावर प्रशासनानं भर दिला असून वारकऱ्यांना मुलभूत सेवा सुविधा आणि आरोग्य सेवा देण्याची तयारी प्रशासनानं केली आहे. जिल्हा प्रशासनं यंदा वारीसाठी जवळपास ११ हजार टॉयलेट उभारणार आहे. तर महिला वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी जवळपास दीड हजार स्नानगृहे उभारण्यात येणार आहेत. तसंच गर्दी होणाऱ्या १३ ठिकाणी हॉटस्पॉट तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी प्रशासन विशेष लक्ष देणार आहे. पावसाची शक्यता लक्षा घेता पंढरपूर शहर, पालखी तळ आणि ६५ एकर परिसरात जवळपास ७५ हजार घनमीटर मुरमीकरणाचे का...