June 22, 2025 7:07 PM June 22, 2025 7:07 PM
26
Palkhi Updates : संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालख्या पुण्याहून रवाना
आषाढ वारीसाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून हडपसरमार्गे पुढे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. तर,संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर इथं असेल. संत मुक्ताबाई पालखीचं आज बीड शहरात स्वागत झालं. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज संध्याकाळी अहिल्यानगरमधे पोहोचली. पोलिस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने दिंडीचं स्वागत करण्यात आलं. आज शहरात मुक्काम करुन उद्या ही दिंडी पंढरपूरकड...