June 28, 2024 8:40 AM

views 33

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूमधून प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पारंपरिक पद्धतीनं पूजाविधी, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा सुरू होईल. आज पालखी देहुतच इनामदार वाड्यात मुक्कामी असेल.

June 19, 2024 7:52 PM

views 27

पालखीमार्गावरची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरची सगळी कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्तीचे कामगार लावावेत, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत सोलापुरातल्या नियोजन भवन इथल्या बैठकीत ते बोलत होते.   आषाढी वारी पालखी सोहळ्यात पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा, रिंगण सोहळा या ठिकाणी पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी योग्य दक्षता घेऊन प्रत्येक विभागांनं नियोजन करा...

June 15, 2024 1:21 PM

views 55

आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या  बैठकीत ते बोलत होते.   वारकऱ्यांसाठी गटविमा योजना, पथकर माफी या सुविधा उपलब्ध असतील, असं ते म्हणाले.  पालखी मार्गाची दुरूस्ती, जास्तीच्या एस टी  गाड्या, पिण्याचं शुद्ध पाणी, दर्शन मंडपात हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची...