July 5, 2024 3:45 PM July 5, 2024 3:45 PM

views 4

आषाढीनिमित्त नाशिकमध्ये सायकल वारी

आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या सायकलिस्ट फाऊंडेशननं आयोजित केलेल्या सायकल वारीचा आज प्रारंभ झाला. या सायकल वारीत ३०० सायकलस्वार सहभागी झाले असून त्यात ४० महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वारीत एका पायानं सायकल चालवणारा  एक दिव्यांग वारकरी देखील सहभागी झाला आहे.

June 28, 2024 8:40 AM June 28, 2024 8:40 AM

views 18

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूमधून प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पारंपरिक पद्धतीनं पूजाविधी, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा सुरू होईल. आज पालखी देहुतच इनामदार वाड्यात मुक्कामी असेल.

June 25, 2024 7:47 PM June 25, 2024 7:47 PM

views 22

पंढरपुरात ४ ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचं यंदा दुसरं वर्ष असून वारकऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्य विभाग पंढरपूर इथं चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी याहीवेळी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि प्रदक्षिणा मार्ग इथं दुचाकीवरून येऊन उपचार करणाऱ्या ऍम्ब्युलन्सची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती सावंत यांनी दिली आहे.

June 25, 2024 3:58 PM June 25, 2024 3:58 PM

views 17

यवतमाळमध्ये दिव्यांग्यांच्या पंढरपूर वारीचं आयोजन

राज्यातली पहिलीच पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूर वारी यवतमाळच्या दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने दृष्टिहीन वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी आज निघाले. संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादूका घेऊन आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजोगाई, कुर्डूवाडी, पंढरपूर असा २२ दिवस ५२१ किमीचा हा प्रवास पायी करून दिव्यांग वारी पंढरपूरला पोहचेल.