July 5, 2025 7:34 PM July 5, 2025 7:34 PM
12
आषाढी एकादशीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात दाखल, आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शनाचंही आयोजन
आषाढी एकादशी सोहळा उद्या साजरा होणार आहे. यानिमित्तानं उद्या पहाटे विठ्ठल रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. या सोहळ्यासाठी हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरी इथं अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर दाखल झाल्या आहेत. भाविकांना विठ्ठलाच्या भेटीची आतुरता लागली असून पंढरपुरात ५ लाखांपेक्षा जास्त वारकरी दाखल झाले आहेत. पंढरपुरात, नगर प्रदक्षिणा मार्ग, नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे. मंदिरामध्ये ...