July 12, 2025 4:44 PM July 12, 2025 4:44 PM
16
आषाढीला एसटीच्या ५ हजार २०० जादा बसगाड्यांतून ९ लाखांहून अधिक भाविकांची सुरक्षित वाहतूक
आषाढी यात्रेनिमित्त यंदा ५ हजार २०० जादा बसगाड्यांच्या माध्यमातून एसटीने साडे एकवीस हजार फेऱ्यांद्वारे तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक - प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आणि त्यांना विठ्ठल दर्शन घडवलं आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. महामंडळानं गेल्या वर्षीपेक्षा यंदा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपये जास्त उत्पन्न मिळवलं. चांगलं उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरुप देवदर्शन घडव...