October 26, 2025 8:32 PM October 26, 2025 8:32 PM
17
२१वं शतक हे भारताचं आणि आसियानचं शतक-प्रधानमंत्री
२१वं शतक हे भारताचं आणि आसियानचं शतक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आसियान-भारत शिखर परिषदेला त्यांनी दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. भारत आणि आसियान, हे संयुक्तरीत्या जगाच्या जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात, असं त्यांनी सांगितलं. या दोघांमधले संबंध फक्त भौगोलिक नाही, तर ऐतिहासिक आणि समान मूल्यांवर आधारित असून, जागतिक अस्थिरतेच्या काळातही त्यात सातत्यपूर्ण प्रगती झाल्याची बाबही प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केली. कोणत्याही आपत्तीच्या काळात भारत, आसियानच...