January 5, 2025 2:01 PM

views 9

टेनिसपटू सुमीत नागल एएसबी टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत दाखल

भारतीय टेनिसपटू सुमित नागलने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या मुख्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्याने आज सकाळी पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या एड्रियन मॅनारिनोचा पराभव केला. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत उद्या, भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रेंच साथीदार अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीचा सामना नेदरलँडचा सँडर एरेंड्स आणि ब्रिटनचा ल्यूक जॉन्सन या जोडीशी होणार आहे.