October 31, 2025 8:31 PM October 31, 2025 8:31 PM

views 20

क्रांतिकारकांना आर्य समाजापासून प्रेरणा मिळाली – प्रधानमंत्री

आर्य समाज ही प्रखर राष्ट्रवादींची संघटना आहे, ही संघटना निर्भयपणे भारतीयतेबद्दल बोलते. लाला लजपत राय आणि राम प्रसाद बिस्मिल यांसारख्या क्रांतिकारकांना आर्य समाजापासून प्रेरणा मिळाली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.  दिल्लीतील आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात प्रधानमंत्री बोलत होते. दुर्दैवाने, राजकीय कारणांमुळे, स्वातंत्र्यलढ्यातील आर्य समाजाच्या भूमिकेला सन्मान मिळाला नाही, असं ते म्हणाले.