June 24, 2024 8:03 PM June 24, 2024 8:03 PM

views 39

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. कथित मद्य धोरण प्रकरणात जामीन प्रकरणी उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. तसंच विशेष न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. त्याला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

June 21, 2024 10:09 AM June 21, 2024 10:09 AM

views 12

अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री तसंच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने काल जामीन मंजूर केला. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. केजरीवाल यांच्या जामीनाला 48 तासांची स्थगिती देण्याची इडी ने केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणी पुढील युक्तिवाद आज न्यायाधीशांसमोर करता येतील, असं न्यायालयाने म्हंटलं आहे.

June 19, 2024 8:38 PM June 19, 2024 8:38 PM

views 19

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयानं आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं. अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली होती. या प्रकरणात माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह एकूण ३८ आरोपी आहेत.