February 13, 2025 3:15 PM February 13, 2025 3:15 PM

views 11

आदित्य ठाकरेंनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. ही भेट मैत्रीपूर्ण भेट असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे यांनी काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. या दोघांमध्ये निवडणूक आयोगावर ईव्हीएम संदर्भात केलेल्या आरोपांबाबत चर्चा झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आह...

January 30, 2025 5:26 PM January 30, 2025 5:26 PM

views 25

ECI : विषारी पदार्थ नदीत प्रवाहित केल्याच्या आरोपासंदर्भात अरविंद केजरीवाल यांच्याकडे स्पष्टीकरण

हरयाणा सरकारने यमुना नदीत जाणीवपूर्वक विषारी पदार्थ प्रवाहित केल्याच्या आरोपासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. हरयाणा सरकारने विषारी पदार्थ प्रवाहित केल्यामुळे यमुनेच्या पाण्यातली अमोनियाची पातळी वाढली आणि पाणी विषारी झालं, अशी तक्रार केजरीवाल यांनी आयोगाकडे केली होती. त्यावर केजरीवाल यांनी उद्या सकाळपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. केजरीवाल यांनी सरसकट आरोप न करू नयेत. हरयाणा सरकारने यमुनेत कोणता विषारी प...

January 19, 2025 7:59 PM January 19, 2025 7:59 PM

views 22

दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांकरता निवृत्तीनंतर सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून द्या – अरविंद केजरीवाल

दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांकरता निवृत्तीनंतर घरं बांधण्यासाठी केंद्र सरकारनं सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.  ते आज दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. जमिनीची मागणी करणारं पत्र आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवल्याचंही त्यांनी सांगितलं. अशी जागा उपलब्ध झाली तर दिल्ली सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घरं बंधू शकेल. सर्वप्रथम सरकारी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, असंही ते म्हणाले.

September 17, 2024 8:23 PM September 17, 2024 8:23 PM

views 15

अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील असं आम आदमी पार्टीने जाहीर केलं आहे. आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्याआधी अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला.  पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आतिशी मुख्यमंत्रीपदी राहतील हा निर्णय एकमताने घेतल्याचं दिल्ली सरकारमधले मंत्री गोपाल राय यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

September 11, 2024 7:32 PM September 11, 2024 7:32 PM

views 13

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ

कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यामुळे   राऊज ॲव्हन्यू न्यायालयातील सुनावणीसाठी तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना हजर केलं. याआधीच सीबीआयनं कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि इतर आरोपींविरोधात न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होते.   दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...

August 14, 2024 1:16 PM August 14, 2024 1:16 PM

views 20

अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला

दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावला. यावर केंद्रीय अन्वेषण विभागानं उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि प्रकरणाची सुनावणी २३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.

August 12, 2024 1:20 PM August 12, 2024 1:20 PM

views 11

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची याचिका

कथित अबकारी धोरण घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण संस्थेने केलेली अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.  या खटल्यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सरन्यायाधीशांना केली. यावर विनंतीचा ई मेल तपासल्यानंतर सुनावणीची तारीख जारी केली जाईल, असं सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितलं.    ५ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्य...

July 12, 2024 1:18 PM July 12, 2024 1:18 PM

views 29

दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

सर्वोच्‍च न्‍यायालयानं ईडीने दाखल केलेल्या कथित मद्य धोरण प्रकरणात  दिल्‍लीचे  मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अंतरिम जामीन मंजूर केला.  ईडीनं केलेल्या अटकेला आव्हान देणारी केजरीवाल यांची याचिका न्‍यायाधीश संजीव खन्‍ना आणि दीपांकर दत्‍ता यांच्या  खंडपीठानं मोठ्या खंडपीठाकडे पाठवली आहे. तथापि  केजरीवाल यांना या प्रकरणी गेल्या २५ जूनला सी बी आय नं अटक केली होती, या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नसल्यानं ते कारागृहातच राहतील.

July 2, 2024 1:05 PM July 2, 2024 1:05 PM

views 20

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी

कथित मद्य घोटाळा प्रकरणी कारागृहात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज न्यायमूर्ती नीना बन्सल क्रिष्णा यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. सीबीआयने आपल्याला अटक करण्यासाठी कोणताही नवा पुरावा सादर केला नाही असं केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

June 25, 2024 3:10 PM June 25, 2024 3:10 PM

views 16

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्तगिती

दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली आहे. ईडीनं सादर केलेली कागदपत्र विशेष न्यायालयानं नीट पाहिली नाही, असं कारण उच्च न्यायालयानं जामीनाला स्थगिती देताना दिलं आहे.