December 11, 2025 8:11 PM December 11, 2025 8:11 PM
5
अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते अपघातात १४ मजूर ठार, ७ बेपत्ता
अरुणाचल प्रदेशातल्या अंजाव जिल्ह्यात एक डंपर हजार फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १४ जण ठार आणि ७ जण बेपत्ता झाले आहेत, तर १ जण बचावला आहे. हे सर्व बांधकाम मजूर आसाममधल्या तिनसुकिया जिल्ह्यातले असून ते गेल्या सोमवारी कामाच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला. ही घटना अत्यंत दुर्गम भागात घडली. त्यामुळे या दुर्घटनेबाबत उशिरा माहिती मिळाल्याचं तिनसुकियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आतपर्यंत १४ मृतदेह सापडले असून इतर ७ जणांचा शोध सुरु आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या द...