August 27, 2025 7:27 PM August 27, 2025 7:27 PM

views 34

राज्यात सर्वत्र ढोलताशाच्या गजरात गणरायाचं आगमन

१० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना झाली. राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं स्थानिक वैशिष्ट्यांसह आणि नवनवीन कल्पना राबवून मंगलमूर्तींचा हा उत्सव साजरा होत आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे.   राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन पूजा केली. यंदाची राजभवनातली शाडूची मूर्ती नाशिक काराग...