August 3, 2025 3:21 PM August 3, 2025 3:21 PM

views 17

पुणे जिल्ह्यात हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक

पुणे जिल्ह्यात यवत इथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक झाली असून ५००हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या १५ आरोपींना ६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.   हिंसाचाराला कारणीभूत ठरलेली वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणालाही अटक करण्यात आली आहे. यवतमध्ये सध्या शांतता असून समाज माध्यमांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत कोणताही पूर्वनियोजित कट आढळला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

August 3, 2025 2:07 PM August 3, 2025 2:07 PM

views 10

मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांशी संबंधित पाच जणांना अटक, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत अतिरेकी संघटनांशी संबंधित आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत कांगलेइपाक कम्युनिस्ट पार्टी या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमरजित सिंह उर्फ नोनो याला अटक करण्यात आली आहे. सिंह याच्यावर महिलांवर अत्याचार करणं, खंडणी, अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.   त्याखेरीज या संघटनेच्या अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्याखेरीज चुराचांदपूर आणि कांगपोकपी या जिल्ह्यांमधून दोन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे...

July 12, 2025 4:01 PM July 12, 2025 4:01 PM

views 11

मोबाईल टॉवरचे यंत्र चोरणाऱ्या टोळीला अटक

मोबाईल टॉवरचे बेसबॅन्ड युनिट चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हे उपकरण चोरी करणाऱ्यांकडून 56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मोबाईल टॉवरचे 5 जी बेसबॅन्ड चोरी होण्याचं प्रमाण तळोजा, खारघर, पनवेल शहर या भागात वाढलं होतं. उपकरणं चोरी झाल्याने नेटवर्क विस्कळीत होऊन नेटवर्क मध्ये अडचणी निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला.   ही उपकरणं बसवण्याचं काम करणाऱ्या कंपनीचा माजी कर्मचारी असलेल्याला एकाचा चोरीत सहभाग उघड झाल्यावर त्याला त्...

March 1, 2025 12:12 PM March 1, 2025 12:12 PM

views 15

भंडारातील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंत्याला लाचलुचपत प्रकरणात अटक

जलशुद्धीकरण कामाचं देयक काढण्यासाठी ४० हजारांची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. प्रभारी उपअभियंता करंजेकर विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   भंडारा इथल्या कंत्राटदाराने भंडारा जिल्ह्यातील चिखली आणि लेंडेझरी या दोन गावातील जलशुद्धीकरणाची कामं पूर्ण केली. केलेल्या कामाचं ९ लाख ८० हजार रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडे सुहास करंजेकर यान...

January 19, 2025 8:16 PM January 19, 2025 8:16 PM

views 13

सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुख्य संशयिताला ५ दिवसांची पोलीस कोठडी

बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली असून त्याला न्यायालयानं ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याचं नाव मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद असं असून तो मूळचा बांग्लादेशी असल्याचा संशय आहे. त्याने आधी आपलं नाव विजय दास असं सांगितलं होतं, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याचं खरं नाव समोर आलं.    प्राथमिक पुरावे आणि त्याच्याकडे आढळलेल्या काही गोष्टींवरून तो बांग्लादेशचा नागरिक असल्याची शक्यता दिसत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे ...

January 15, 2025 8:43 PM January 15, 2025 8:43 PM

views 9

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांना अटक

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर येओल यांना ग्योंगगी प्रांतातल्या ग्वानचेओन इथल्या तपास कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात त्यांनी  मार्शल लॉ जारी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यांच्याविरुद्धच्या राष्ट्रद्रोहाच्या आरोपांची अद्याप चौकशी सुरू असून दक्षिण कोरियात राष्ट्रपतींना अटक होण्याची ही पहिली वेळ आहे.