November 8, 2025 3:12 PM November 8, 2025 3:12 PM

views 25

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या तरुणाला अलिबाग पोलीसांनी केली अटक

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या एका तरुणाला अलिबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यावेळी त्याच्याकडून इंजेक्शनच्या दहा बाटल्या आणि काही रोकड रक्कम जप्त केली.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षी साखर इथल्या कोळीवाडा परिसरात सूरज मनोज राणे हा तरुण मेफेन्टर माईन सल्फेट हे गुंगीकारक इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता ही इंजेक्शन तो जीममध्ये जाणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेणाऱ्या तरुणांना विकत असल्याचं उघड झालं.

August 12, 2025 7:57 PM August 12, 2025 7:57 PM

views 19

३० कोटींच्या जीएसटी अफरातफरप्रकरणी मॅजिक गोल्ड कंपनीचा संचालक अटकेत

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने मॅजिक गोल्ड बुलियन या कंपनीविरोधात केलेल्या कारवाईत कंपनीचा संचालक यशवंत कुमार टेलर याला अटक केली आहे. टेलर याने ३० कोटी ५१ लाख रुपयांच्या महसुलात अफरातफर केल्याचा आरोप आहे.   वस्तुंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बिलं जारी करणाऱ्या पुरवठादारांकडून चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणं किंवा वापरणं अशा कारवायांमध्ये टेलर याचा सहभाग असल्याचं आढळलं आहे. टेलर याला मुंबईच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

June 2, 2025 8:12 PM June 2, 2025 8:12 PM

views 25

दहशतवाद विरोधी पथकाकडून ठाणे जिल्ह्यात १२ संशयितांना अटक

दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यात छापेमारी करून १२ संशयितांना अटक केली. दहशतवाद विरोधी पथकानं साकिब नाचण, अकिब साकिब नाचण, अब्दुल लतीफ कासकर, कैफ नाचण, शाजील नाचण, फारक झुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची आणि परिसराची झडती घेतली. झडती दरम्यान ६ जण त्यांच्या घरात आढळले नाहीत. ए टी एस नं पुढील तपासासाठी १२ जणांना अटक केलं आहे.

July 1, 2024 3:44 PM July 1, 2024 3:44 PM

views 18

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात सीबीआयने गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक केली आहे. ५ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचं केंद्र या शाळेतही होतं. गुजरात पोलिसांनी यापूर्वी ५ जणांना अटक केली असून नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किमान २७ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयने चौकशी हातात घेतल्यावर या अरोपींचा ताबा मागितला आहे.