February 24, 2025 1:34 PM February 24, 2025 1:34 PM
11
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या दौऱ्यावर
भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्याला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. फ्रान्सचे लष्करप्रमुख जनरल पियर शिल यांच्याशी पॅरिसमधील लेस इनव्हॅलिड्स इथं चर्चा करण्यापूर्वी लष्करप्रमुखांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. उद्या, जनरल द्विवेदी मार्सेलला जाणार असून तिथं ते फ्रेंच सैन्याच्या तिसऱ्या विभागाला भेट देतील. पहिल्या महायुद्धा...